
15-Feb-2019
प्रेस नोट ...मराठीत...
सर्व जिल्हा सचिव, खालील प्रेस नोट सोयीनुसार दुरुस्त करून आपापल्या जिल्ह्यतील पेपर मध्ये प्रसिद्ध करणे. कॉ.नलावडे सर्कल सेक्रेटरी ------------------------------------------------------- मा. संपादक, दैनिक,___________________ |
|
|
|
|
|
||||||||||
|
|
|
BSNL ही संपुर्णपणे सरकारी मालकीची parlimentary Act नुसार स्थापन झालेली 1,80,00 कर्मचारी कार्यरत असणारे, 80,000 करोडची स्थावर मालमत्ता असणारी, काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यात, नक्षलीभागात अविरत सेवा देणारी सरकारी कंपनी आहे. ती अशी एका रात्रीत कधीच बंद होऊ शकत नाही. काही वृत्त माध्यमांना हाताशी धरुन खाजगी दुरसंचार कंपनीने हा खोडसाळपणा केला आहे. इतिहास पाहता BSNL संपवू पाहणार्यांना माहित नाही का अगदी काही दिवसापूर्वी केदारनाथ असो अथवा तामिळनाडू वा केरळ देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत फक्त BSNL च लोकांच्या मदतीला आले आहे. खाजगी दुरसंचार कंपन्यांसारखा फक्त आर्थिक फायदा हे उद्दिष्ट न ठेवता, सर्वदुर सर्वसामान्यांना सेवा पुरविण्याचे अविरत काम BSNL काल ही करत होती, आजही करते आहे आणि भविष्यातही अशीच करत राहणार यात शंकाच नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.पूर्वीचा दूरसंचार विभाग व आताचे बीएसएनएल गेल्या अनेक वर्षापासून दूरसंचार सेवा भारतीय जनतेला शहरापासून ते अंत्यंत दुर्गम भागात देत आली आहे.कधीही फक्त नफ्याचा विचार न करता सार्वजनिक क्षेत्रात ग्राहकांची बरोबर देशाची सेवा म्हणून काम करते.एक सरकारी कंपनी म्हणून खेडोपाडी,देशाच्या सीमेवर,नक्षलवादी ठिकाणी आर्थिकदृष्ट्या विचार न करता सेवा देत आहे व देत राहील.आजही ग्रामीण भागात आर्थिकदृष्ट्या सेवा देणे परवडत नसताना अनेक दूरध्वनी केंद्र तोट्यात चालवत आहोत.गेल्या काही दिवसापासून विजेचे दर वाढविल्या मुळे सेवा तोट्यात चालवीत आहोत.
खाजगी कंपनीला सरकार पाठीशी घालून ४ जी स्पेक्ट्रम बीएसएनएलची अगोदरची मागणी असताना त्यांना अगोदर दिले व या कंपनीला अनेकवेळा संघर्ष करूनही अद्याप दिलेले नाही. खाजगी कंपनीला सरकार बँकेकडून कर्ज घेण्यासाठी परवानगी देते परंतु हि सरकारी कंपनी असून सुद्धा बँकेकडून कर्ज घेण्यास परवानगी देत नाही.
दुर्मिळ भागात सेवा पुरवित असताना सुद्धा कंपनीला अनुदान देणे बंद केले आहे.
साहजिकच या सर्व गोष्टी मुळे बीएसएनएल कंपनी गेल्या काही दिवसापासून तोट्यात गेली आहे.याबाबत कर्मचारी संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली परंतू सरकार याकडे लक्ष न देता कंपनी तोट्यात चालली म्हणून खाजगी कंपनीला मदत करण्याच्या हेतूने हि कंपनीकडे दुर्लक्ष करत आहे. काही खाजगीकरण धार्जिणे हि कंपनी लवकरच बंद होणार अशी वल्गना व अफवा पसरवून कंपनीचे खच्चीकरण व कामगारांचे मनोधर्य खाचाविण्याचे प्रयत्न करत आहे.
आशा प्रकारच्या अफवा पसरवून बीएसएनएल कंपनीचे ग्राहन्कामध्ये संभ्रम निर्माण करून एक प्रकारे प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहे.परंतु आम्ही सर्व कर्मचारी संघटना आमच्या ग्राहन्काच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही.आमच्या कंपनीसाठी व ग्राहन्कासाठी आम्ही कटिबद्ध असून जी सेवा आमच्याकडे साधनसामुग्री ची पूर्तता कमी असताना देत आलो ती यापुढे हि देणार हेच निवेदनाद्वारे सांगू इच्छितो.
आपले नम्र.
सोबत
11-Feb-2019
१ लाख ७० हजार बीएसएनएल कर्मचा-यांचे कुटुंब अंधारात...- AUAB ने दि.१५/०२/२०१९ रोजी "कौटुंबिक सदस्यांसह रॅली" आयोजित करणार...
[तारीख:11 - फेब्रुवारी-201 9] एक लाख सत्तर हजार बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे भविष्य काळोखात आहे. सरकार बीएसएनएल कंपनी संपविण्याची प्रयत्न करत आहे. सरकारला वाटते कि बीएसएनएलने रिलायन्स जियोच्या बरोबरीने स्पर्धा करू नये म्हणून बीएसएनएलला 4 जी स्पेक्ट्रमसाठी परवानगी देत नाहीत. बीएसएनएलने रिकाम्या जागेतून (रिक्त जमिनीतून) कमाई करण्यास परवानगी मागितली आहे परंतु ती परवानगी देत नाहीत. एकीकडे बीएसएनएलने बँक कर्ज घ्यावे असे सरकारला वाटत नाही परंतु दुसरीकडे रिलायन्स जियोसह खाजगी दूरसंचार कंपन्या लाखो कोटी रुपयांना सरकारी बँकांकडून कर्ज घेत आहेत. सरकार मोठ्या दिमाखाने सांगते कि कामगारांच्या कुटुंबांना तृप्त करण्यासाठी ते सर्वकाही करत आहेत, परंतु हे लक्षात येते कि येत्या काळात बीएसएनएल कंपनीतील कर्मचार्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही.
हे सरकारला नीती आयोगानुसार कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीची वय 60 ते 58 पर्यंत कमी करायची घाई करत आहे.यातून कर्मचार्यांमध्ये दहशत निर्माण करत आहेत आणि त्याद्वारे त्यांना व्हीआरएस घेण्यास भाग पाडून घरी जाण्यास उद्युक्त करत आहेत.
मा. मोदी सरकारच्या मते, रिलायन्स जिओ ही सरकारी कंपनी आहे म्हणून त्यांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि बीएसएनएल कंपनी खाजगी समजून मोडीत काढत आहे. या सरकारच्या आदेशावरून भारतीय रेल्वेने बीएसएनएलचे कनेक्शन बंद करून रिलायन्स जियोकडून कनेक्शन घेतले आहे. या निर्णयाच्या मागे कोण आहे? आम्ही हे अन्याय करू देणार नाही. कॉमरेडस,चला आता आपण उभे राहू या ! आणि बीएसएनएल संपुष्टात आणणाऱ्या सरकारच्या षड्यंत्राशी लढू या !!. हि महान बीएसएनएल कंपनी भारतातील सामान्य जनतेची (लोक) आहे. ते खरे आमचे मालक आहेत. त्यासाठी आपण देशाच्या लोकांकडे जाऊ आणि बीएसएनएल वाचवण्यासाठी त्यांचे समर्थन घेऊ. शेवटी ते जिंकणारे लोक आहेत. AUAB ने कर्मचार्यांना १५/०२/२०१९ रोजी "कौटुंबिक सदस्यांसह रॅलीज" आयोजित करण्याची विनंती केली आहे. बीएसएनएलईयू परीमंडळ आणि जिल्हा संघटनांना कळविते कि अशा रॅलींना ऐतिहासिक यश मिळवण्यासाठी सर्व पावले उचलण्यात यावीत. तरी बीएसएनएलईयूसहित सर्व संघटना व असोशियनच्या प्रत्येक कर्मचार्यांनी १५ फेब्रूवारी २०१९ रोजी त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणण्यास लाज वाटू देवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
तरी सर्व जिल्हासचिव व परिमंडळ पदाधिकार्यांनी वरील आदेशाचे पालन सर्व जिल्हा स्तरावर एकजुटीने करण्यात यावे हि नम्र विनंती.
हीच ती वेळ ...एकत्रित होवू या ! ...लढा देवू या !! ....आणि जिंकू या !!!
कामगार एकजुटीचा विजय असो !!!!
08-Feb-2019
मुंबई ---- बीएसएनएलइयु संघटनेची सर्कल ऑफिस सांताक्रूझ मुंबई येथे महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी तातडी बैठक संपन्न.

महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बैठक (Circle Working Committee Meeting) दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ रोजी पणजी (गोवा) येथे,कॉ.आप्पासाहेब गागरे यांच्या अध्यक्षतेखाली व बीएसएनएलईयुचे अखिल भारतीय उपाध्यक्ष व परिमंडळ सचिव कॉ.नागेशकुमार नलावडे यांच्या उपस्थितीत पार पडली .
कॉ.नागेशजी नलावडे , महाराष्ट्र परिमंडळ सचिव –सी एच क्यू च्या आदेशानुसार ताबडतोब तातडीची परिमंडळ कार्यकारणी बैठक दि.६ फेब्रुवारी ला घेण्यात यावी व दिनांक १८ फेबु ते २० फेब्रु २०१९ च्या संपाविषयी चर्चा करण्यता यावी. विशेषकरून बैठकीमध्ये AUAB ला आपल्या मागण्या बाबत मा. संचार मंत्री व डी ओ टी यांनी जे आश्वासन दिले मात्र पाळले नाही त्या मुळे संप करणे हाच एकाच पर्याय आहे व त्यासाठी संप यशस्वी करणे भाग आहे,नीती आयोगाने केलेल्या शिफारसी त्यावर सरकारची नीती व AUAB नी दिलेले आदेश यावर सर्व कार्यकारणीमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी व तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य सभासदापर्यंत हि माहिती पोहोचविण्याच्या उद्देषाने आजची सी डब्लू सी घेण्यात येत आहे.
बीएसएनएल कंपनीची आर्थिक परस्थिती दिवसोन्दिवस खूपच वाईट होत चालली आहे.अनेक कारणे आहेत त्या मध्ये महत्वाचे १).आऊटसोर्सिंग चा वाढलेलें खर्चाचे प्रमाण ,नको तेथे आऊटसोर्सिंग करून खर्च वाढविलेला आहे.
२.)ओ.एफ.सी.साठीचा मेन्टनस खर्च.अनेक ठिकाणी बोगस बिले तयार करून खर्च्र वाढविला जातो.
३) गरज नसताना अनेक साधनसामुग्रीच्या खरेदी करून वापरत न आणता नुसते टेंडर काढून बिले खर्ची टाकले.
बीएसएनएल कंपनी केंद्र सरकारच्या अखीरीत्यामध्ये असून सुद्धा सरकार कंपनी संपविण्याचे काम करत आहे.आर्थिक मदत करण्याचा करार असताना सुद्धा मदत करावयाची सोडून कर्ज घेण्यास अडथळे आणत आहे , शिवाय नितीआयोगाच्या शिफारसी अमलात आणण्याचा विचारही करत आहे.नीती आयोगानुसार सेवानिवृतीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे.त्या बाबत व तिसरे वेतन कसे असावे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात यावी अशी विनंती सभेला सचिवानी केली
ज्या जिल्हा सचिवानी त्यांच्या जिल्ह्याचे जिल्हाअधिवेशन पार पाडले नसतील तर त्यांनी सर्कल अधिवेशनच्या अगोदर घेण्यात यावीत.
महाराष्ट्र सर्कल मध्ये आपल्या संघटनेचे ९००० पेक्षा जास्त सभासद असून आपली जबाबदारी संप यशस्वी करण्याची जबाबदारी जास्त असल्याने आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कंपनीच्या साधनसामुग्रीच्या किंमतीचा विचार केला तर कंपनी तोट्यात येवू शकत नाही.परंतु सरकार फक्त ल्यांड जरी कंपनीला हस्तातारींत केली तरी आपण तोट्यात राहू शकत नाही शिवाय पेन्शन वर्गणी प्रत्यक्ष मूळवेतनावर घेतले तर आपणास डीओटी कडून २००० हजर करोड येणे आहे.[VA1]
.
खालील जिल्हा सचिव व महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणी सदस्य यांनी त्यांचे वरील विषय म्हणजे नितीआयोगाच्या नुसार सेवानिवूर्तीचे वय , व्ही आर इस,व तिसरे वेतन करार याबाबीवर अभिप्राय व सूचना मांडण्यात आल्या. --- त्या मध्ये कॉ.अजय फडके,सह सचिव सर्कल ऑफिस मुंबई ,कॉ.नरेश कुंभारे जिल्हा सचिव नागपूर,कॉ.मिलिंद पळसुले,संघटन सचिव ,सांगली ,कॉ.चाटे ,अध्यक्ष,जिल्हासचिव कॉ.खंडागळे लातूर,कॉ. एस.बी.सूर्यवंशी परभणी,कॉ.पुरोषात्तम गेडाम,रायगड जिल्हा सचिव ,कॉ.कुबेर जालना, कॉ.वाघमारे जिल्हासचिव औरंगाबाद जिल्हा कॉ.,सौ.साधना महाडिक संघटक सचिव मुंबई,,कॉ.कोंडाळवाडे,जिल्हा सचिव नांदेड,,कॉ.गणेश वाघाटे,सिंधदुर्ग ,कॉ.मधु चांदोरकर मुंबई ,कॉ.संजय नागणे,जिल्हासचिव,धुळे, जिल्हासचिव कॉ.लहाने नाशिक, कॉ.कौतिक बस्ते.जिल्हासचिव,कल्याण, कॉ.निलेश काळे,जिल्हा सचिव,जळगाव, कॉ.संदीप गुळून्जकर ,सर्कल उपाध्यक्ष ,कॉ.माने ,सह सचिव महाराष्ट्र सर्कल अहमदनगर, .कॉ.विजय बेळगावकर जिल्हा सचिव गोवा,कॉ.अमिता नाईक,सिसिएम ,कॉ.गुलाब काळे,कॉ.अतुल वाटवे व कॉ.विठ्ठलराव औटी ,सह सचिव महाराष्ट्र परिमंडळ,.कॉ.गुळुंजकर ,कॉ.वरगुडे उपाध्यक्ष म.परिमंडळ ,तसेच कॉ.दामले जिल्हासचिव, यवतमाळ ,अकोला,बुलढाणा,अमरावती,कॉ.पाखरे बीड, रवी बाविस्कर कॉ,बिडकर जिल्ह् सचिव, डब्लू,टी.पी.,डब्लू टी.आर.सर्कल ऑफिस,सिव्हील/इलेक्ट्रिकल विंग यांनी त्यांच्या जिल्ह्यांच्यावतीने विचार मांडले.
सर्वांनी येत्या १८ ते २० फेब्रुवारी २०१९ रोजी होणारा संप त्यांच्या जिल्ह्यात इतर auab च्या नेत्यांच्या व कार्माच्र्यांच्या सहकार्याने १०० % यशस्वी करण्यात येईल असे सांगण्यात आले.
त्यावर शेवटी कॉ.नलावडे परिमंडळ सचिव यांनी सविस्तर विचार मांडले व सांगितले कि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हि संघटना या पुढेही कर्मचार्यांच्या समस्याबरोबर बी एस एन एल कंपनीसाठी लढणार आहे.
अखेर परिमंडळ कोशाध्यक्ष कॉ.गणेश हिंगे हे म्हणाले कि अंत्यंत कमी वेळेत कॉ.नलावडे परिमंडळ सचिव यांनी आमच्या मुंबई सर्कल शाखेवर हि कार्यकारणी बैठक घेण्याची जबाबदारी टाकली व सदर जबाबदारी आम्ही मुंबई शाखेच्या मोलाच्या सहकार्याने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.काही कमी वाटले तर सांभाळून घ्यावे असे सांगितले.
शेवटी कॉ.नागेशकुमार नलावडे परिमंडळ सचिव यांनी सर्व प्रतिनिधी,सर्व जिल्हा सचिव,सर्व परिमंडळ कार्यकारणी व मुंबई सर्कल शाखेचे सर्व कोम्ब्रेड ज्यांनी हि सी.डब्लू.सी.कमी कालावधीत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले असे कॉ.गणेश हिंगे कॉ.माने कॉ.केकरे जिल्हा सचिव मुंबई सर्कल ऑफिस व त्यांची सर्व टीम यांचे विषेश आभार मानून अधिवेशन समाप्त करण्यात आले.
, फाईल औटी-२५/वेबसाईट सर्कल/२०१९
01-Feb-2019
3 दिवसांच्या स्ट्राइकसाठी नोटीस जारी
एयूएबीने आज 3 दिवसांच्या ( दिनांक १८ ते २० जानेवारी २०१९) स्ट्राइकसाठी नोटीस जारी केली. आज झालेल्या एओएबी बैठकीत स्ट्राइक नोटिस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त केली गेली की, एयूएबीने केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, विशेषतः तिसर्या वेतन पुनरावृत्ती समस्येचे निराकरण झाले नाही. पुढे, आज आयोजित झालेल्या एओएबी बैठकीत बीएसएनएलच्या पुनरुत्थानाशी संबंधित आणखी काही मागण्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला गेला. एयूएबीच्या इतर घटकांच्या समन्वयाने, सर्व मंडळाच्या आणि जिल्हा सचिवांना, स्ट्राइक प्रभावीपणे यशस्वी करण्यासाठी सर्वाना विनंती.
आपल्या मागण्या मिळविण्यासाठी वेळ फारच कमी आहे, सर्व जिल्हा संघटनां व शाखा संघटनाला विनंती करण्यात येते कि हा स्ट्राइकची सर्व सभासदांना पटवून शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी तळागाळात सभा आयोजित करण्याची विनंती केली जाते.[तारीख: 01 - फेब्रुवारी - 201 9]
View File
01-Feb-2019
महाराष्ट्र सर्कल वर्किंग कमिटी (CWC) साठी स्पेशल रजेबाबताचे पत्र .....

बुधवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०१९ रोजी होणारया बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ कमिटीच्या बैठकिला स्पेशल रजेबाबतचे पत्र सोबत देत आहोत. सोबत पत्र पहा
01-Feb-2019
दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्र सर्कल वर्किंग कमिटी (CWC) ची तातडीची बैठक .....

दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ पासून तीन दिवसाचा संप करण्याचा निर्णय AUAB ने घेतला आहे.संपाची पूर्व तयारी व इतर विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०१९ (सकाळी १०.३० ) रोजी बीएसएनएलईयु महाराष्ट्र परिमंडळ कमिटीची बैठक “कॉन्फरन्स हॉल”दुसरा मजला,महाराष्ट्र सर्कल ऑफिस ,जुहू रोड,सांताक्रूझ,मुंबई-५४. या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
सदर बैठकीची नोटीस सोबत जोडत आहोत.
तरी सर्व जिल्हा सचिव व महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीला विनंती कि बैठकीसाठी वेळेवर हजर राहावे
.................कॉ.नागेशकुमार नलावडे,परिमंडळ सचिव,महाराष्ट्र.
सोबत नोटीस पहा
01-Feb-2019
आज AUAB ची महत्वाची बैठक... संघर्ष करण्यासाठी तयार रहा..
३१/०१/२०१९ ..कल एडिशनल सेक्रेटरी, टेलीकॉम से हुई AUAB की चर्चा के उपरांत AUAB की CMD BSNL से कल और साथ ही आज भी चर्चाएं हुई।
इसी के क्रम में, AUAB के प्रतिनिधि पुनः श्री अंशु प्रकाश, एडिशनल सेक्रेटरी, टेलीकॉम से आज दोपहर में मिले। और उनके लिए यह आश्चर्यजनक था, जब एडिशनल सेक्रेटरी, टेलीकॉम ने AUAB के प्रतिनिधियों को यह बताया कि 5% फिटमेंट देना भी बहुत कठिन होगा। AUAB ने कल 5% फिटमेंट का प्रस्ताव स्वीकार नही किया था। इस पृष्ठभूमि में, कल 11.30 am पर AUAB की मीटिंग होगी। मीटिंग में चार्टर ऑफ डिमांड्स पर यथोचित निर्णय लिया जाएगा। सभी एग्जीक्यूटिव्ज और नॉन एग्जीक्यूटिव्ज से अनुरोध है कि वें संघर्ष के लिए तैयार रहें।
01-Feb-2019
पे रिवीजन से पेंशन रिवीजन को पृथक करने के माननीय संचार राज्य मंत्री द्वारा दिए गए आश्वासन से भटकाव (deviation) का AUAB द्वारा विरोध
३१ जानेवारी २०१९
03.12.2018 को माननीय संचार राज्य मंत्री और AUAB के बीच हुई मीटिंग में पे रिवीजन से पेंशन रिवीजन को पृथक करने का आश्वासन दिया गया था। किंतु, DoT में बैठे अधिकारी माननीय संचार राज्य मंत्री द्वारा दिए गए आश्वासन के बावजूद मुद्दे को भटकाने का प्रयास कर रहे हैं। उदाहरण के लिए DoT द्वारा डिपार्टमेंट ऑफ पेंशन और पेंशनर्स वेलफेयर को लिखे गए पत्र में माननीय मंत्री महोदय के निर्णय को कमजोर तरीके से प्रस्तुत किया गया है। उक्त पत्र में DoT द्वारा DoP & PW से पूछा गया है कि क्या पेंशन रिवीजन को पे रिवीजन से पृथक किया जा सकता है। कल एडिशनल सेक्रेटरी, टेलीकॉम से हुई मीटिंग में भी DDG(Estt), DoT तर्क दे रहे थे कि पेंशन रिवीजन, पे रिवीजन के बाद ही किया जाएगा। AUAB के प्रतिनिधियों ने इसका तत्काल विरोध करते हुए मांग की थी कि माननीय संचार राज्य मंत्री द्वारा दिए गए आश्वासन को क्रियान्वित किया जाए। दोनों तर्कों को सुनने के बाद AS(T) ने निर्देशित किया कि इस संबंध में AUAB और DDG(Estt), DoT पुनः चर्चा करें। तदनुसार कल ही AUAB के प्रतिनिधियों और श्री एस के जैन,DDG(Estt), DoT के बीच और चर्चा हुई। AUAB ने दृढ़ता के साथ कहा कि माननीय संचार राज्य मंत्री द्वारा दिए गए निर्णय अनुसार पे रिवीजन से पेंशन रिवीजन को पृथक करने के निर्णय का अनुपालन किया जाए। माननीय मंत्री महोदय के निर्णय को डायल्यूट करने के प्रयासों के तीव्र विरोध को देखते हुए, DDG(Estt) ने आश्वासित किया कि वें इस मुद्दे पर AS(T) से पुनः चर्चा करेंगे।
01-Feb-2019
AUAB और CMD BSNL के बीच मीटिंग
Jan 31, 2019
कल एडिशनल सेक्रेटरी, टेलीकॉम के साथ संपन्न मीटिंग पश्चात AUAB के प्रतिनिधियों ने CMD BSNL से चर्चा की। डायरेक्टर (HR) भी उपस्थित थीं। CMD BSNL, बीएसएनएल के रिवाइवल के संबंध में DoT को प्रेजेंटेशन देने वाले हैं। इस पृष्ठभूमि में, AUAB के प्रतिनिधियों ने CMD BSNL को कहा कि AS(T) द्वारा प्रस्तावित 5% फिटमेंट के साथ पे रिवीजन स्वीकार योग्य नही है। उन्होंने CMD BSNL को जोर दे कर कहा कि कर्मचारियों को 15% फिटमेंट के साथ ही 3rd पे रिवीजन दिया जाए।
30-Jan-2019
२५ जाने.रोजी (AUAB )आयुबची झालेल्या बैठकित तीन दिवस संपाचा निर्णय.
मा. संचार मंत्री व डी.ओ.टी.ने बीएसएनएल मधील संघटनाना दिलेल्या आश्वासनवर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे बीएसएनएलमधील सर्व संघटना व असोशियन्स दिनांक १८ फेबुवारी २०१९ पासून तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर निर्णय (हिंदीत)पुढील प्रमाणे ..
.....निर्णय.....
(1) जमीनी हकीकत के मद्दे नज़र, मीटिंग ने सभी एग्जीक्यूटिव्ज व नॉन एग्जीक्यूटिव्ज से 18.02.2019 से तीन दिवसीय हड़ताल पर जाने का आव्हान किया।
(2) 11.02.2019 से 5 दिन तक नुक्कड़ सभाएं आयोजित कर आम जनता का हमारी डिमांड्स हेतु समर्थन प्राप्त किया जाए।
(3) 12 और 13 फरवरी, 2019 को परिमंडल और जिला स्तर पर प्रेस वार्ता की जाए।
(4) सभी राजनीतिक दलों से हमारी डिमांड्स, विशेष रूप से बीएसएनएल का रिवाइवल, हेतु समर्थन हासिल करने के लिए मुलाकात की जाए।
डिमांड्स
(1) 15% फिटमेंट के साथ 3rd पे रिवीजन का निराकरण ।
(2) बीएसएनएल मैनेजमेंट द्वारा प्रस्तुत प्रस्ताव अनुसार बीएसएनएल को 4G स्पेक्ट्रम का आवंटन।
(3) 01.01.2017 से बीएसएनएल रिटायरिज का पेंशन रिवीजन
(4) गवर्नमेंट के नियमों के तहत बीएसएनएल द्वारा पेंशन कॉन्ट्रिब्यूशन का भुगतान।
(5) 2nd पे रिवीजन कमिटी के शेष मुद्दों का निराकरण।
(6) a) बीएसएनएल की भूमि प्रबंधन नीति (Land Management Policy) का शीघ्र अनुमोदन।
b) नाम परिवर्तन (mutation) की और बीएसएनएल की स्थापना के समय लिए गए निर्णय अनुसार सभी संपत्ति (assets) बीएसएनएल को स्थानांतरित करने की कार्यवाही त्वरित पूर्ण की जाए ।
(7) बीएसएनएल की स्थापना के समय ग्रुप ऑफ मिनिस्टर्स द्वारा लिए गए निर्णय अनुसार बीएसएनएल की वित्तीय जीवंतता सुनिश्चित करने हेतु वित्तीय सहयोग दिया जाए। बीएसएनएल के बैंक से ऋण लेने के लिए प्रस्ताव हेतु "लेटर ऑफ कम्फर्ट" जारी किया जाए।
(8) बीएसएनएल के मोबाइल टॉवर्स का आउटसोर्सिंग के माध्यम से रखरखाव का प्रस्ताव रद्द (Scrap) किया जाए।
[Date : 25 - Jan - 2019]
तरी सर्व जिल्हा सचिव व शाखा सचिवांना विनंती करण्यात येते कि वरील सर्व सूचनांचे पालन करून कर्मचार्यामध्ये जागृती करून आपल्या मागण्या मिळविण्यासाठी हा संप यशस्वी करणे अंत्यत गरजेचे आहे.हा संप बीएसएनएल कंपनी व कर्मचार्यासाठी ‘करो या मरो” असा आहे.
तेंव्हा सर्वांनी या संपात पूर्ण ताकतीने उतरणे व यशस्वी करणे ,कारण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आपल्या मागन्या मंजूर करून घेण्याची हिच ती वेळ आहे.
कामगार एकजुटीचा विजय असो.!..... इन्कलाब जिंदाबाद !!
कॉ. नागेशजी नलावडे,परिमंडळ सचिव.महाराष्ट्र.